सवाल अच्छे है!
![]() |
| Sketch Courtesy : A famous sketch on the state of emergency in 1976 by Mr. R. K. Laxman |
आव्हाने नेहमीच स्वतःला परखण्यास प्रवृत्त करतात, ती उणिवा दाखवून देतात, त्यावर विचार करायला भाग पाडतात. सद्यस्थितीमध्ये एका विषाणूने हे सर्वच्या सर्व केलं आहे. कोणत्याही समाजास प्रश्न पडणे हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. कोरोना संकटाच्या निमित्ताने सर्वांनाच खडबडून जागं केलंय. या संकटसमाप्तीनंतर जगास पूर्वपदावर आणण्यासाठी अनेक आर्थिक चर्चा होताना दिसतात, त्या व्हायलाच हव्यात. परंतु आपल्या आर्थिक आणि राजकीय हव्यासापोटी, महत्त्वपूर्ण, तरीही नेहमीच तुच्छ मानून दुर्लक्षित केलेल्या अनेक प्रश्नांची मिमांसा करणे गरजेचे, म्हणूनचा हा लेखनप्रपंच.
'जनतेवरील सरकारची वाढलेली पाळत, समाजाच्या सर्वच हालचालींवरती लादलेले कठोर निर्बंध, संचारबंदी आणि हे सर्व करण्यासाठी पोलिसी कारवाई, हे सर्वच्या सर्व कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अत्यंत गरजेचं आहेच. परंतु या सर्वांची जनतेला सवय होईल का? आणि तशी सवय झालीच तर एवढ्याच सहजगत्या हीच जनता भविष्यामध्ये सरकारने एखाद्या क्षुल्लक कारणासाठीही लागू केलेले निर्बंध मान्य करेल काय?' - टाळेबंदीने संपूर्ण जग आपापल्या घरात बंद असताना, निर्माण झालेला आणि खोलवर विचार करायला लावणारा हा पहिला प्रश्न. आणि तो अगदी साहजिकपणे विचारला जातोय प्रत्येक देशातील काही निवडक विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून, म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नाही.
ज्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी राहून कार्य करणारे काँग्रेसजन आणि इतर भारतीय, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आता काय करायचे? या प्रश्नाने सुस्तावले होते त्याप्रमाणेच; कोरोनोत्तर काळातदेखील अशा प्रकारचे सामाजिक सुस्तावलेपण येईल काय? पहिल्या प्रश्नासोबतच या दुसऱ्या चिंताजनक प्रश्नावर विचार करणे आवश्यक.
पर्यावरणाच्या घटकांमध्ये झालेली सुधारणा ही टाळेबंदीच्या काळातील चांगल्या बाजुंपैकी एक बाजू. जवळचं पाहत राहत पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे याचा सारासार विचार न करता, आहे तेवढ्यात खुश राहणं हा नेहमीच सर्वात सोयीस्कर मार्ग. तो या निमित्ताने आपण निवडलाय. याचं कारण, शहरांच्या किंवा नद्यांच्या जलवायू परिस्थिती मध्ये झालेली तात्पुरती सुधारणा यांची सर्वत्र चर्चा दिसून येते, परंतु हे किती सहज आणि अल्पकालीन आहे यावर बोलायला कोणीही तयार नाही. शाश्वत विकासाच्या आजपर्यंत केवळ गप्पाच मारणारे विकसित आणि विकसनशील देश, कोरोनोत्तर काळात निसर्गाचा आणखी जास्त ओरबाडा करत या तात्पुरत्या सुखद गोष्टींवर पाणी फेरणार, हे वास्तव समोर दिसत असताना, उपाययोजना दूरच पण त्यावर एखादं अवाक्षर देखील काढण्यास तयार नाहीत.

जगभरामध्ये आत्तापर्यंत जवळपास दीड लाख लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मागील वर्षीच्या एका जागतिक अहवालानुसार वायू प्रदूषणामुळे एकट्या भारतात वर्षाकाठी 1 लाख 20 हजार लोकांनी आपले प्राण गमावले आहेत हे स्पष्ट केलं. सध्याचा विषाणू कितीही महाभयंकर असला तरीही संपूर्ण सजीवसृष्टीच्या मुळावरच उठेल असा नाही. परंतु सगळ्या सजीवसृष्टीचाच घास घ्यायला बसलेल्या आपल्याच कृत्यांची आपणच उशीर होण्यापूर्वी दखल घ्यायला हवी. जागतिक वातावरण बदलांसंबंधातील प्रश्न, त्याच्याशीच अगदी जवळून संबंध असलेले जगाच्या अन्नसेवनाच्या सवयींविषयीचे प्रश्न या सर्वांवर सखोल चर्चा होऊन एकमत होणे गरजेचं आहे. ते येत्या काळात होणं अपेक्षित आहे. केवळ बढाया मारत दुर्लक्ष केलं की काय होतं हे अमेरिकेसारख्या महासत्ता देशाची सद्यस्थिती पाहून समजेलच. वरील प्रश्नांची उत्तरं कितीही जटील असली तरीही 'सवाल अच्छे है' म्हणत त्यांना भिडण्याची वेळ आली आहे.

अगदी बरोबर..! पर्यावरण सुधारते आहे हे आपल्याकडून चुकून होतंय कारण आपण जीव वाचवण्यासाठी घरामध्ये आहोत. पण हे कोरोना संकट गेल्यानंतर पुन्हा ही परिस्थिती आपल्याला दिसणार नाही.. त्यामुळे आताची परिस्थिती भविष्यामध्येही अशीच राहण्यासाठी काहीतरी रणनीती आखणे शहाणपणाचे ठरेल..! म्हणून यासंबंधीचे सवाल अच्छे हैं असं म्हणायला काही हरकत नाही
ReplyDeleteExactly...👍
Delete🙌👆👍👌
ReplyDelete👍👌
ReplyDeleteयावर विचार करून, निष्कर्ष काढणं गरजेचे आहे 👍👍
ReplyDelete👌एकंदरित कोरोना सगळ्या बाजूंनी आपले परिणाम दाखवत आहे.
ReplyDelete👍👌
ReplyDelete👍
ReplyDelete