Posts

सांगे पूर्वजांची कीर्ती...

Image
  (The beautiful evening view of Virupaksh Temple from Hemkuta Hills, Hampi) लहानपणी आजीकडून ऐकलेल्या रामायण-कथांमधील हनुमानाचे जन्मस्थान - अंजनी पर्वत, सुग्रीव आणि रामाची भेट झालेली गुहा, माता शबरीची झोपडी आदी इत्यादी सर्व कुठे असेल? बालकथांमधे वाचलेले राजा कृष्णदेवराय आणि त्याचा चाणाक्ष सल्लागार तेनाली राम आणि दूरदर्शनवरील कार्टूनमध्ये पाहिलेलं त्यांचं विजयनगर साम्राज्य हे खरंच प्रत्यक्षात असेल का? आणि असेल तर ते कुठे असेल? पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील 'कानडा राजा पंढरीचा' गाणं लहानपणापासून ऐकत आलो होतोच पण जसजसं समजायला लागलं तसतसा पडलेला एक प्रश्न म्हणजे - पंढरपूरमधील आपला मराठी विठ्ठल 'कानडी' कसा काय असू शकतो? यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली संघ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मध्ययुगीन इतिहास वाचताना आणि ज्याक्षणी हे लक्षात आलं की या सर्वांची उत्तरं विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या कर्नाटकातील 'हंपी'मध्ये सप्रमाण पाहायला मिळतील, त्याच क्षणी हंपी गाठायचं ठरलं! कोरोनाकालीन दोन वर्ष आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी...

माणसा मैदानात ये...!

Image
A Sketch by Canadian Artist Ashkan Golizeh showing statue of liberty goddess, New-York city. करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळी सर्व धर्मांची श्रद्धास्थानं बंद केली गेली त्यावेळी त्यावर प्रतिक्रिया म्हणून अत्यंत अपेक्षित असे दोन सूर आपल्यातून उमटले. त्यातील पहिला वर्ग हा देवांनी कसे जागतिक साथीसमोर हात टेकले हे सिद्ध करण्यात लागला होता आणि दुसरा वर्ग पहिल्या वर्गाचा मुद्दा खोडून काढण्यात लागला होता. गेली चार दशकं धर्माचा आधार घेऊन आपलं राजकारण रेटणाऱ्या एका पक्षाच्या मुखपत्राने यावर 'देवांनी मैदान सोडले' या आशयाचे संपादकीय लिहिले. ते अर्थातच अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच्या त्यांच्या राजकीय शीर्षासनास साजेसे असेच. त्यावर प्रत्युत्तर म्हणून काहींनी वेदातील एका संस्कृत श्लोकाचा आधार घेतला. न देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत्। यं हि रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संयोजयन्ति।। याचा अर्थ होतो, 'देव मेंढपाळांप्रमाणे हातात काठ्या घेऊन आपले रक्षण करत नाहीत. स्वतःचे रक्षण करण्यासाठी ते आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये पुरेसे शहाणपण देतात.' खरं तर या निरर्थक चर्...

प्राण तळमळला...

Image
Photo Credit: Indian Express, Migrants walking home from Ahmedabad मूलभूत गरजा पूर्ण करीत किमान सन्मानजनक जीवन जगता यावं हा प्रत्येक सजीवाचा हक्क. स्वतःव्यतिरिक्त इतर प्राण्यांचा तो हक्क मानव म्हणून आपण संधी मिळेल तिथे पायदळीच तुडवतो. परंतु मानवजातीत सुद्धा एका वर्गास, पदोपदी या किमान सन्मानजनक जीवनाचा दुर्दैवानं अभावचं सहन करावा लागतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून काही श्रमिकांची पायी आपल्या स्वगृही परततानाची दृश्यं हे त्याचं ताजं उदाहरण. त्यांच्यावर ही वेळ येण्याची बरेचं जणं आपल्या सोयीची कारणं पुढे करतायत, परंतु या परिस्थितीकडे समग्र कारणांचा परिणाम म्हणून पाहणं गरजेचं आहे. पहिलं आणि सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे सरकारांचं अपयश. मग ती राज्य सरकारे असोत किंवा केंद्र सरकार, प्राप्त परिस्थितीला दोन्ही सरकारे तितकीच जबाबदार. टाळेबंदी नंतर या वर्गामध्ये भीतीचं वातावरण आणि हातावर पोट असल्याने, कामबंदमुळे अस्वस्थता होती. त्यासाठी केंद्र सरकारने जून अखेरपर्यंतची मोफत धान्य पुरवठ्याची घोषणा केली आणि रूढ परंपरेने त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारांवर आली. अशातच केंद्र आणि राज्य...

पडिले वळण इंद्रिया सकळा...

Image
एकच अनुभव जेव्हा मेंदूला वारंवार येऊ लागतो तेव्हा मेंदू त्या अनुभवाची आणि त्याला दिलेल्या प्रतिसादाची तीव्रता कमी करतो. वैज्ञानिक संज्ञेत याला ‘ हॅबिच्युएशन ’ (Habituation) म्हणजेच सवय होणे म्हणतात. वैयक्तिक , सामाजिक आणि सामाजिकतेच्याच चौकटीत येणाऱ्या प्रशासकीय सवयी हा बऱ्याच वेळा चर्चेचा विषय असतो , यापूर्वीही यावर केवळ चर्चाच खूप झाली आहे. कोणत्याही चर्चेसाठी औचित्य गरजेचं आणि हे औचित्य सद्यस्थितीने साधलंय. म्हणून पुनःश्च यावर विचार करून अधिक कृती करण्याची आवश्यकता आहे. ' सवाल अच्छे है! ' या मागील लेखात संभाव्य सामाजिक संथपणा किंवा सुस्तपणा यावर भाष्य झालंच आहे. येत्या काळात ही संभाव्य सवय आपण व्यक्ती आणि समाज म्हणून अंगीकृत न करता त्यापासून किती अंतर ठेवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. असो , ते येणाऱ्या काळात समजेलच. कोविड विषाणूच्या निमित्ताने एक गोष्ट चांगली झाली म्हणता येईल. शहरापासून गावापर्यंत सर्वांच्याच मनात आरोग्यविषयक समज वाढायला मदत झाली. या समजाची आणि आरोग्याबरोबरच स्वच्छतेचीही आता सर्वांना सवय व्हावी हीच अपेक्षा. मध्यम वर्ग आणि साधनसंपन्न उच्च वर्ग...

सवाल अच्छे है!

Image
Sketch Courtesy : A famous sketch on the state of emergency in 1976 by Mr. R. K. Laxman आव्हाने नेहमीच स्वतःला परखण्यास प्रवृत्त करतात , ती उणिवा दाखवून देतात , त्यावर विचार करायला भाग पाडतात . सद्यस्थितीमध्ये एका विषाणूने हे सर्वच्या सर्व केलं आहे . कोणत्याही समाजास प्रश्न पडणे हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण मानले जाते . कोरोना संकटाच्या निमित्ताने सर्वांनाच खडबडून जागं केलंय . या संकटसमाप्तीनंतर जगास पूर्वपदावर आणण्यासाठी अनेक आर्थिक चर्चा होताना दिसतात , त्या व्हायलाच हव्यात . परंतु आपल्या आर्थिक आणि राजकीय हव्यासापोटी , महत्त्वपूर्ण , तरीही नेहमीच तुच्छ मानून दुर्लक्षित केलेल्या अनेक प्रश्नांची मिमांसा करणे गरजेचे , म्हणूनचा हा लेखनप्रपंच . ' जनतेवरील सरकारची वाढलेली पाळत , समाजाच्या सर्वच हालचालींवरती लादलेले कठोर निर्बंध , संचारबंदी आणि हे सर्व करण्यासाठी पोलिसी कारवाई , हे सर्वच्या सर्व कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अत्यंत गरजेचं आहेच . परंतु या सर्वांची जनतेला सवय होईल का ? आण...